येथील जैन इरिगेशन कंपनीच्या गांधी तीर्थ आणि अनुभूती शाळा या दोन वास्तूंना ‘आर्टिस्ट इन कॉंक्रिट अ‍ॅवार्ड एशिया फिस्ट २०१३-१४ या वर्षांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला.
रिफाय आर्टिसन्स अ‍ॅड प्रा. लिमीटेड,पुणे आणि रचना संसद आर्किटेक्चर अकादमी ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे हा पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी हे दोन्ही पुरस्कार, जागतिक किर्तीचे वास्तुविशारद प्रा. जोहानी पलास्मा आणि जो नॉयरो यांच्या हस्ते स्वीकारले.
यावेळी वास्तुविशारद गोखान अ‍ॅव्हीसग्लु (तुर्कस्तान), एडवर्ड होलीस(लेडन) अ‍ॅडम होंडो (ऑस्ट्रेलिया) फ्रेजर हे (सिंगापूर) जो नोएरो (आफ्रिका) ली हुआ( चीन) क्रिस्तोफर बिनीगर या विदेशी पाहुण्याची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे येथील हॉटेल हयात येथे वास्तू स्थापत्य कलेविषयी दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात वास्तूू कला, आर्किटेक्चरल अ‍ॅंड लॅंडस्केपिंग या विषयांवर विविध चर्चासत्रे आयोजि करण्यात आली होती.
कार्यक्रमासाठी जगभरातील नामांकित वास्तूविशारद तज्ज्ञ, इंटेरिअर डिझायनर, लॅंडस्केप डिझायनर आणि विविध बांधकाम कंपन्यानी सहभाग नोंदवला.
जैन इरिगेशन कंपनीच्या ‘गांधी तीर्थ’ या वास्तूला ‘सिव्हिक आणि कम्युनिटी बीग कन्स्ट्रक्षन  या विभागात प्रथम पुरस्कार मिळाला तर शैक्षणिक क्षेत्रातील मोठे बांधकाम म्हणून ‘अनुभूती’ शाळेच्या वास्तूला प्रथम क्रमांक मिळाला.
वास्तू विशारद तज्ज्ञ प्राची जैन यांनी या दोन्ही वास्तूंच्या स्थापत्य कलेबाबतचे सविस्तर सादरीकरण केले.