शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष अंकुशराव देशमुख यांनी ठाकरे यांच्या जालना दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला. जिल्ह्य़ात इतरत्रही अनेक ठिकाणी श्रद्धांजलीपर सभा झाल्या. दरम्यान, ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे शहरात अनेकांनी दर्शन घेतले.

अविनाश कव्हळे, संजय कोठोडे, देविदास राठोड, नूर अहमद, संजय देशमुख, भास्कर देशमुख, श्रीनिवास इंद्राणी, शिवाजी म्हस्के, मकरंद पोखरकर, संदीप भाकरे, अशोक लव्हाडे, सदानंद देशमुख, राम भालेराव, नीलेश महाजन, मजहर सौदागर, विजय साळी, भगवान पाटील, गणेश शेळके, संघवाल वाहूळकर आदी पत्रकारांची उपस्थिती या वेळी होती. भोकरदन येथे सर्वपक्षीय सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी आमदार संतोष दसपुते, संतोष दानवे, शिवाजी थोटे, नगराध्यक्षा अर्चना चिने, लक्ष्मण दळवी, सुधाकर दानवे आदींची या वेळी श्रद्धांजलीपर भाषणे झाली. अंबड येथे सर्वपक्षीय सभेत ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आमदार विलासराव खरात, बाबुराव कुळकर्णी यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. बदनापूर येथेही सर्वपक्षीय सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. कुंभार पिंपळगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात श्रद्धांजली वाहण्यात आली. घुंगर्डे हदगाव, जामवाडी, टेंभूर्णी, जाफराबाद, बारसवाडा, राजूर, रांजणी घनसावंगी येथेही विविध पक्षांच्या वतीने ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अस्थिकलश आणल्यानंतर आयोजित सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष सांबरे, माजी आमदार शिवाजीराव चोथे, जि. प.चे माजी अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, पंडितराव भुतेकर, विलासराव नाईक, वंदना कुलकर्णी, सविता किवंडे आदींची भाषणे झाली.