भारत विद्यालयाच्या संस्थापिक शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतिदिनी दिवाकरभय्या आगाशे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा विधायक पत्रकारिता पुरस्कार येथील पत्रकार संजय जाधव व रणजितसिंग राजपूत यांना प्रदान करण्यात आला.
येथील भारत विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या समारंभाला पद्मश्री क विवर्य ना.धों. महानोर, लेखिका क विता महाजन, प्रा.स्वाती काटे, संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, सुधाताई क ोर्डे, मुख्याध्यापक विलास देशमुख , शालीकराम उन्हाळे, डॉ. सीमा आगाशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एन.डी.टी.व्ही.चे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव यांना प्राचार्य विलासराव देशमुख यांच्या हस्ते, तर गुड इव्हिनिंग सिटीचे प्रबंध संपादक रणजितसिंग राजपूत यांना क विवर्य ना.धों. महानोर यांच्या हस्ते शाल श्रीफळासह सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रक्क म देऊन गौरविण्यात आले.
अमेरिकेतील डॉ. तारा प्रमोद कानेटकर यांनी दिलेल्या २५ लाख रुपयांच्या देणगीतून शाळेसाठी प्रार्थना हॉल आणि बॅडमिंटन क ोर्टचे भव्य सभागृह बांधून दिल्याबद्दल त्यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2013 रोजी प्रकाशित
संजय जाधव व राजपूत यांना विधायक पत्रकारिता पुरस्कार
भारत विद्यालयाच्या संस्थापिक शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतिदिनी दिवाकरभय्या आगाशे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा विधायक पत्रकारिता पुरस्कार येथील पत्रकार संजय जाधव व रणजितसिंग राजपूत यांना प्रदान करण्यात आला.
First published on: 05-02-2013 at 02:57 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist award to sanjay jadhav and rajput