कालिदास महोत्सव मार्च महिन्यात रामटेक व नागपुरात होणार असल्याचे रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांनी सांगितल्याने हा महोत्सव होणार की नाही, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
नियोजित वेळ निघून गेल्याने हा महोत्सव होणार की नाही असे वाटत होते. या महोत्सवासाठी लागणाऱ्या निधीत शासनाकडून वाढ करून द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी हिवाळी अधिवेशनात संबंधित सचिवांशी भेट घेऊन चर्चाही केली होती. आमदार आशीष जयस्वाल यांनी आग्रहदेखील केला होता. तसे प्रयत्नही सुरू केले
होते.
आता कालिदास महोत्सवाला मुहूर्त सापडला असून तो ९ व १० मार्चला रामटेकला होणार आहे. त्यानंतर १६ व १७ मार्चला नागपुरात आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी आमदार निधीतूनही निधी देणार असल्याचे जयस्वाल म्हणाले. महोत्सवासाठी निधी अपुरा पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2013 रोजी प्रकाशित
कालिदास महोत्सव मार्चमध्ये
कालिदास महोत्सव मार्च महिन्यात रामटेक व नागपुरात होणार असल्याचे रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांनी सांगितल्याने हा महोत्सव होणार की नाही, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. नियोजित वेळ निघून गेल्याने हा महोत्सव होणार की नाही असे वाटत होते. या महोत्सवासाठी लागणाऱ्या निधीत शासनाकडून वाढ करून द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी हिवाळी अधिवेशनात संबंधित सचिवांशी भेट घेऊन चर्चाही केली होती. आमदार आशीष जयस्वाल यांनी आग्रहदेखील केला होता. तसे प्रयत्नही सुरू केले होते.
First published on: 21-02-2013 at 05:16 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalidas mahotsav is from march