कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांचा ताफा घेऊन फिरणाऱ्या महापालिकेने त्यासाठी भरावे लागणारे शुल्क मात्र थकविले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने यासंबंधी महापालिकेस पत्र पाठविले आहे. संरक्षण सेवेची २९ लाख ६४ हजार ७४५ रुपयांची रक्कम महापालिकेने थकविली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. विशेष करून ग्रामीण भागात अशा बांधकामांचे प्रमाण अधिक आहे. या बांधकामांवर कारवाईसाठी पोलिसांचा मोठा ताफा बाळगण्यात आला आहे. शहरात पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. फेरीवाल्यांना हटविण्याचे काम काही अधिकारी पोलीस संरक्षण न घेताही करतात. असे असले तरी कारवाई करताना अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने पोलिसांचा ताफा बाळगला आहे. शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर फारशी कारवाई होताना दिसत नाही. तसेच कल्याण, डोंबिवली अशा दोन्ही रेल्वे स्थानकांना लागून फेरीवाल्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येतात. याविरोधातही फारशी प्रभावी कारवाई सुरू आहे, असे चित्र दिसत नाही. असे असताना पोलिसांचा ताफा बाळगल्याबद्दल महापालिकेवर लाखो रुपयांच्या थकबाकीचा डोंगर उभा ठाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस संरक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च होत असेल, तर अतिक्रमणांविरोधात प्रभावी कारवाईसुद्धा व्हायला हवी, अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2012 रोजी प्रकाशित
कल्याण डोंबिवली पालिकेने थकविले पोलीस संरक्षण सेवेचे २९ लाख रुपये
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांचा ताफा घेऊन फिरणाऱ्या महापालिकेने त्यासाठी भरावे लागणारे शुल्क मात्र थकविले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने यासंबंधी महापालिकेस पत्र पाठविले आहे.
First published on: 30-11-2012 at 12:16 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc not paid 29 lakh rupee to protection money to police