कृषी विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या फार्मर पोर्टलवर कृषी संबंधित वेगवेगळ्या विषयांची माहिती देण्यात येत आहे. या पोर्टलमध्ये शेतक ऱ्यांना हवामान, कीड नियंत्रण, बाजारभाव, पीक उत्पादनाबाबत एसएमएस सेवा दिली जात आहे. यामध्ये वर्षभरात राज्यातील १६ लाख शेतक ऱ्यांनी नोंदणी केली असून ते या सेवेचा लाभ घेत आहेत.
ही सेवा शेतकऱ्यांना विनामूल्य असून एसएमएसद्वारे माहिती वेळीच प्राप्त असल्याने त्यांना शेतीकामाचे नियोजन करणे अधिक सोयीचे झाले आहे. ‘एमकेआयएसएएन डॉट जीओव्ही डॉट आयएन’ या संकेतस्थळावर जाऊन या विकल्पातून नवीन नोंदणी करता येईल. कृषी उपसंचालक (प्रकल्प), कृषी आयुक्तालय, शिवाजीनगर, पुणे यांच्याकडे पत्राद्वारे स्वत:चे नाव, मोबाईल क्रमांक, तालुका, जिल्हा, पिकांची माहिती अंतर्भूत करून एमकेआयएसएएनएमएस डॉट एमएच अ‍ॅट जीमेल डॉट कॉम  या ई-मेलवर पाठवावी, असे आवाहन कृषी उपसंचालकांनी केले आहे.