केंद्र आणि राज्य सरकार सुरू करत असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे सर्वसामान्यांना लाभ होत नाही. आमची लढाई सर्वसामान्यांसाठी असून सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच माळेचे मणी असल्याची टीका माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांनी केली. ते पत्रकार बठकीत बोलत होते.
लोकशासन आंदोलन समितीच्या वतीने जिल्ह्य़ात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आलेली आहेत. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे हा आमचा प्रांजळ हेतू आहे. आष्टी येथे झालेल्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांना धडकी भरली असून, आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा लाभ होत नाही. विरोधकही ठोस भूमिका घेत नाही. सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच माळेचे मणी आहेत. आष्टीत पुन्हा १ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही कोळसे पाटील यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2014 रोजी प्रकाशित
सत्ताधारी आणि विरोधक एकाच माळेचे मणी माजी न्या. कोळसे पाटील यांची टीका
केंद्र आणि राज्य सरकार सुरू करत असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे सर्वसामान्यांना लाभ होत नाही. आमची लढाई सर्वसामान्यांसाठी असून सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच माळेचे मणी असल्याची टीका माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.
First published on: 06-01-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolse patil rural opposite same bid