गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये नेत्यांच्या भाषणापूर्वी मतदारांना खूश करण्यासाठी वैशाली सामंतची ‘कोंबडी पळाली’, ‘चममच करता है ये नशीला बदन’ वगरे गाणी कामी आली. दलेर महेंदीच्या ‘तरारा’ गाण्यावर शब्दरचना बदलून नेत्यांच्या नावाचा गवगवा होता.. आताही निवडणुकांची रणधुमाळी अजून बहरात यायची आहे. पण एक बदल मात्र लक्षवेधी ठरला आहे. जाहीर सभांपूर्वी मतदारांना या वेळी देशभक्तिपर गीते ऐकवली जात आहेत. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनापासून हा बदल झाल्याचे मत कलाकारही आवर्जून नोंदवितात.
‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’ ही सुलोचनाबाईंची लावणी मराठी माणसांसाठी मौजेची बाब. चाल तीच ठेवून ‘गाव सांभाळ मतासाठी गं आला, तुमच्या उसाला लागल कोल्हा’ असे विडंबन पूर्वी रचले गेले. निवडणुकांमध्ये प्रमुख दोन्ही पक्षांकडून त्याला चांगली मागणी असे. गेल्या निवडणुकीत ‘कोंबडी पळाली तंगडी धरून’ या गाण्याची चालही भलतीच गाजली. एवढी, की मराठवाडय़ात सोनिया गांधींच्या सभेपूर्वी वैशाली सामंत यांचा कार्यक्रम याच गाण्यावर बेतलेला होता.
शिवसेनेच्या सभेत पक्षाचे गाणे म्हटले, की बाकी मराठी गाणी म्हणावी लागत. पण अलीकडे सगळय़ाच पक्षांच्या नेत्यांनी करमणूक करणाऱ्या कलाकारांनाही देशभक्तीचा माहोल बनवा, अशा सूचना दिल्या जात आहेत. औरंगाबाद शहरात असे कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांचे वेगवेगळे संच आहेत. ‘आलाप’ची अभिजित िशदे व सरला िशदे ही जोडी बहुतांश कार्यक्रमाआधी मनोरंजन करत असते. या अनुषंगाने बोलताना अभिजित िशदे म्हणाले, की अजून तसा प्रचार सुरू झाला नाही. पण महिनाभरात जे १५ कार्यक्रम झाले, त्यात देशभक्तीची गाणीच म्हटली जावी, असा पक्षातील नेत्यांचाही आवर्जून आग्रह असतो. पूर्वी उडत्या चालीवरची गाणी म्हटली जात.
सन १९९५पासून गाण्यांचे जाहीर कार्यक्रम करणारे राजेश सरकटे म्हणाले, की ‘या वेळी देशभक्तीची गाणी म्हणा, असे नेतेमंडळी सांगत आहेत. पूर्वी खूप वेगवेगळी गाणी म्हणत असू. गेल्या काही दिवसांत हा बदल झाला आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर हा बदल दिसतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kombdi palali songs in election aurangabad
First published on: 20-02-2014 at 01:05 IST