कोपरगाव नगरपरिषदेच्या येसगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावात अनेक वर्षांपासून साठलेला गाळ लोकसहभागातून काढण्याच्या योजनेस बुधवारी हिरकणी महिला दूध संघाच्या अध्यक्षा स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
याप्रसंगी तहसीलदार राहुल जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे खाजेकर, मुख्याधिकारी शिवाजी कापरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, सुमित कोल्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विनोद राक्षे, दत्तोबा जगताप आदी यावेळी उपस्थित होते.  श्रीमती कोल्हे यावेळी म्हणाल्या, सध्या दुष्काळाचे चित्र भयानक आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची मोठय़ा प्रमाणात टंचाई जाणवत आहे. नगरपालिकेचे येसगाव शिवारात जे पाण्याचे साठवण तलाव आहे त्यात मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. तो काढण्यासाठी तालुक्यातील जेसीबीधारकांना आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या सहकार्यातून गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पर्यायाने या तळ्यांची साठवण क्षमता वाढून पाणी साठाही वाढणार आहे.