संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत  सन २००९-१० या वर्षांतील राज्यस्तरीय १० लाख रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने पटकाविला होता. मुंबई येथे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पाणीपुरवठा सचिव अरुण पोरवाल, उपसचिव ए. शैला, संत गाडगेबाबा समितीचे अध्यक्ष समिर पुर्वे आदी तसेच या समारंभाला उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रिवद्र पाटील, उपकार्यकारी अधिकारी अनंत महाजन, लोणी बुद्रुकच्या सरपंच राजश्री विखे, उपसरपंच अनिल विखे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब साबळे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव िशदे आदी उपस्थित होते.
लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने गेल्या ५ वर्षांत विविध सरकारी अभियानांमध्ये सुमारे ७० लाख रुपयांची बक्षिसे मिळवून राज्य स्तरावर अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, युवक नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी याबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.