महिला महोत्सव, आदर्श मातांचा सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव, महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन, अशा विविध स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन शुक्रवारी होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना यांच्यावतीने करण्यात आले आहे.
येथील आशीर्वाद फाऊंडेशनच्यावतीने महिला दिनाच्या पूर्वदिनी महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी ९ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या या महोत्सवास लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत
‘स्त्री कथा आणि व्यथा’ या विषयावर रांगोळी स्पर्धा होईल. ‘माझ्या मनातील स्त्री स्वातंत्र्य’ विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेते तसेच ‘माझ्या बाळाची भावमुद्रा’ स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल. ‘माझे अनुभव, माझे विश्व’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून त्यात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला सहभागी होणार आहेत. महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा जगताप तसेच महिला आणि कायदा या विषयावर दिपाली मानकर मार्गदर्शन करतील. दरम्यान, संघर्षमय परिस्थितीचा सामना करून आपल्या मुलांना वाढविणाऱ्या महिलांना ‘मातोश्री केशरबाई जगताप आदर्श माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार्थींमध्ये कस्तुराबाई साळवे, संगीता पाटील, नम्रता द्विवेदी आणि कौशल्या निरभवणे यांचा समावेश आहे. महोत्सवाला महिलांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मनिषा जगताप यांनी केले आहे.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सांस्कृतीक ज्ञानपीठच्यावतीने गुरूवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक आणि महिला गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परशुराम साईखेडकर नाटय़गृहात हा कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘मविप्र’ संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांच्यासह बिरचंद नहार, धीरज शेळके, अशोक बागमार, पराग झालावत, विजय कासलीवार उपस्थित राहणार आहेत. महिला गौरव पुरस्काराने आ. निर्मला गावीत, डॉ. शोभा बच्छाव, माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे, शेफाली भुजबळ, शर्वरी लथ, डॉ.उषा खाबिया, उषा शेळके, शोभा छाजेड, प्रिती कुलकर्णी, शोभना बूब, ज्योती देशमुख, रोहिणी नायडू, अॅड. मिलन खोहर, शिल्पा शहा, वैजंयती भट, ज्योती सोनवणे, सुहासिनी बुरकुले, संगीता जाधव, विद्या पाटील, डॉ. कविता बोंडे आणि उर्मी झालावत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवराज्य पक्षाच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता जेलरोज येथील पार्वतीबाई नगर उद्यानात जिजाऊ महिला रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पक्षाच्या जिल्हा सचिव रत्नप्रभा वाघ यांनी दिली. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयराम पूरकर, शिवराज्य पक्षाचे सचिव रविंद्र जाचक, उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. संजय जाधव आदी उपस्थित राहतील. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खुशबू भुडे, भाग्यश्री काळे, ऐश्वर्या बुरड, पुष्पलता उदावंत, सुवर्णा सोनवणे, मंदाकिनी ओझरकर, शीला आहेर, चित्रा भट, अनिता चोळकर, कुसुम भावनाथ, कुसुम आहेर यांना गौरविले जाईल.
विश्वास सहकारी बँकेतर्फे महिला दिनानिमित्त शुक्रवारी दुपारी ४ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्यावतीने स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत संकलेचा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. संकलेचा ‘महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी’ या विषयी मार्गदर्शन करतील. दरम्यान, बँकेच्या निवडक महिला कर्जदारांचा नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2013 रोजी प्रकाशित
सावित्रीच्या लेकींच्या गौरवासाठी पुढे आल्या अनेक संघटना
महिला महोत्सव, आदर्श मातांचा सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव, महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन, अशा विविध स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन शुक्रवारी होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना यांच्यावतीने करण्यात आले आहे. येथील आशीर्वाद फाऊंडेशनच्यावतीने महिला दिनाच्या पूर्वदिनी महिला महोत्सवाचे

First published on: 07-03-2013 at 02:30 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots of assocations came forward for savitrichya leki honour