काँग्रेस कमिटी येथे आयोजित कार्यक्रमात भारतरत्न स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती आणि भारताच्या माजी पंतप्रधान, माजी खासदार कै. दत्ताजीराव कदम यांची पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
काँग्रेस भवनात संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते कै. दत्ताजीराव कदम व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक आरगे होते.
या वेळी त्यांनी दत्ताजीराव कदम, इंदिराजी गांधी  आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काही आठवणी उपस्थिांसोबत व्यक्त केल्या.
 श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाला प्रभारी नगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाशराव सातपुते, अहमद मुजावर, शहर काँग्रेस सरचिटणीस शेखर शहा, तौफिक मुजावर, सुनील पाटील, संभाजी काटकर, रहिमान खलिफा, शशांक बावचकर, भीमराव अतिग्रे, चंद्रकांत शेळके, सुरेश गोंदकर, प्रकाश दत्तवाडे, अमरजित जाधव, दत्तात्रय कित्तुरे, दत्तात्रय मोहिते व कार्यकर्ते उपस्थित होते.