एका विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी लष्करातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सीताबर्डी पोलिसांनी दाखल केला आहे.
झिरो माईल्सजवळील लष्कराच्या मेस कॉलनीत आरोपी पपेंद्रसिंह बिजेंद्रसिंह चव्हाण राहतो. १४ डिसेंबरला घरातील खोलीत छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याची पत्नी रुबी हिचा मृतदेह आढळला होता. सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. रुबी व पपेंद्रसिंह या दोघांचे २७ मे २०११ रोजी लग्न झाले. तो मूळचा मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्य़ातल्या महेगाव तालुक्यातील काहोर गावचा राहणारा आहे. लग्नात हुंडय़ाच्या स्वरूपात आरोपी पपेंद्रला सहा लाख रुपये रोख व आठ तोळे सोने देण्यात आले होते. तरीही आरोपी पपेंद्र, त्याचे वडील बिजेंद्रसिंह, आई ओमादेवी चव्हाण, भाऊ निटू उर्फ धमेर्ंद्र चव्हाण, जोगेंद्रसिंह चव्हाण (सर्व रा. काहोर) हे रुबीवर माहेरून चार लाख रुपये व पल्सर गाडी आणण्यासाठी दबाव आणत होते. त्यासाठी ते तिला मानसिक त्रास देऊन मारहाण करीत होते. त्याला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार रुबीचा भाऊ प्रमोदसिंह डबेदारसिंह सिकरवार (रा. खिंडोरा, तिलावली जि. मुरेना) याने सीताबर्डी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला.
१० जणांचा सशस्त्र हल्ला
एका वाहतूकदाराच्या कार्यालयावर दोन वाहनातून आलेल्या दहाजणांनी सशस्त्र हल्ला करून वाहतूकदारास गंभीर जखमी केल्याची घटना अमरावती मार्गावरील वडधामना येथे घडली. दहाही आरोपींना वाडी पोलिसांनी अटक केली आहे. जागेच्या वादातून हे प्रकरण घडल्याची पोलिसांची माहिती आहे. महादेव श्रावण बोरकर (रा. वडधामना) हे गंभीर जखमीचे नाव असून त्याला मेयो रुग्णालयात दखल करण्यात आले. अमरावती मार्गावरील शिवशक्ती नगरातील चिंतामणी कार्गो सव्र्हिस या कार्यालयात महादेव बसला होता. काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास इंडिका कार (एमएच/३१/बीबी/११४५) व स्कॉर्पिओ(एमएच/१५/बीडी/१४८२)े तेथे येऊन थांबल्या. आरोपी राष्ट्रपाल रवाजी वाघमारे (रा. नवनीतनगर), शशिकांत नंदू महानंदे (रा. अजनी), प्रणय हंसराज कुरकुडे (रा. जोगीनगर), प्रशांत किसन निंबारते (रा. इंद्रायणीनगर), रितेश खेमचंद्र गौर (रा. नवनीतनगर), सिकंदर गुलाब शेख (रा. भरतवाडा), राहुल नरेश रंगारी (रा. रामेश्वरी), संतोष गणेश दयार ( रा. पार्वतीनगर), अरविंद चिरकुट उमख (रा. दत्तवाडी) व एक बाल आरोपी उतरले. त्यांच्या हातात बेसबॉल स्टिक, काठय़ा व कोयत्यासारखी शस्त्रे होती. अश्लील शिवीगाळ करीत आलेले आरोपी कार्यालयात शिरले. महादेव बोरकरवर त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती समजल्यानंतर वाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. दहाही आरोपी त्यांच्या हातात
सापडले.
दुचाकीस्वार ठार
ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला. कामठी रोडवरील सायोना शाळेजवळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात हरभजनसिंग ठार झाले. कुलवंतकौर व अस्मितकौर या दोघी जखमी झाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2012 रोजी प्रकाशित
विवाहितेची आत्महत्या; लष्करातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
एका विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी लष्करातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सीताबर्डी पोलिसांनी दाखल केला आहे. झिरो माईल्सजवळील लष्कराच्या मेस कॉलनीत आरोपी पपेंद्रसिंह बिजेंद्रसिंह चव्हाण राहतो. १४ डिसेंबरला घरातील खोलीत छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याची पत्नी रुबी हिचा मृतदेह आढळला होता. सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. रुबी व पपेंद्रसिंह या दोघांचे २७ मे २०११ रोजी लग्न झाले. तो मूळचा मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्य़ातल्या महेगाव
First published on: 27-12-2012 at 01:42 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married women suside