इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंबरनाथ-बदलापूर शाखेच्या वतीने रविवार १७ फेब्रुवारी रोजी सूर्योदय सभागृह, साई विभाग, अंबरनाथ (पूर्व) येथे एकदिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत विविध वैद्यकीय व्यावसायिक प्राथमिक तसेच अद्ययावत आरोग्य सुविधांविषयी व्याख्याने देणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेचे पुरस्कर्ते आणि वर्धा येथील सेवाग्राममधील कस्तुरबा रुग्णालयात ग्रामीण आरोग्य विमा योजना यशस्वीपणे राबविणारे डॉ. उल्हास जाजू या परिषदेत सकाळी ११ वाजता ‘सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामस्वराज्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
याशिवाय डॉ. राकेश पटेल, डॉ. सुनील कवठे, डॉ. योगेश पालशेतकर, डॉ. विजय चिले, डॉ. अनुज भासीन, डॉ.बिजय कुट्टी, डॉ. प्रमोद जोग, डॉ. अजित वझे, डॉ. सुहास प्रभू, डॉ. कृष्णकुमार आणि डॉ. प्रतीक तांबे यांचीही दिवसभरात व्याख्याने होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2013 रोजी प्रकाशित
अंबरनाथमध्ये आज वैद्यकीय परिषद
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंबरनाथ-बदलापूर शाखेच्या वतीने रविवार १७ फेब्रुवारी रोजी सूर्योदय सभागृह, साई विभाग, अंबरनाथ (पूर्व) येथे एकदिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
First published on: 17-02-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical seminar in ambarnath today