प्रादेशिक मनोरुणालयातील रुग्णांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेने मंजूर केली आहे.
या प्रकल्पाला चालना देण्यासाठी महापालिकेची सुदामा मित्र योजना धंतोलीतील मराठी प्राथमिक कन्या शाळेमध्ये राबविली जाणार आहे. मानसोपचार उपसंचालक डॉ. कुमावत यांनी नुकतीच शाळेतील प्रस्तावित जागेची पाहणी केली.
रुग्णांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ, मानसिक आरोग्य तज्ज्ञ, अॅक्युप्रेशर थेरपीस्ट यांची समिती गठीत करण्यात येईल आणि ही संपूर्ण योजना दक्षता समितीसमोर ठेवून परवानगी घेण्यात येईल.
या ठिकाणी रुग्णांना शिंपीकाम, सुतारकाम, पेटिंग, एम्ब्रायडरी, योगासन आदी प्रशिक्षण दिले
जाईल.त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याशी योजनेबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांच्यासोबत प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभय गजभिये, सहायक संचालक डॉ. राठोड, उपअधीक्षक डॉ. मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने, डॉ. के.एल. माहेश्वरी आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
मनोरुग्णांचे पुनर्वसन होणार धंतोलीतील शाळेच्या जागेत
प्रादेशिक मनोरुणालयातील रुग्णांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेने मंजूर केली आहे.
First published on: 29-11-2012 at 01:54 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mentalist rehabilitation going to done in dhantoli school area