व्यापाऱ्यांनी गेल्या १ जानेवारीपासून लागू केलेल्या नव्या दराने एलबीटीचा भरणा करावा, असे आवाहन लातूर व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले.
व्यापारी महासंघाची बैठक अध्यक्ष बसवराज वळसंगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. एलबीटीच्या सुधारित दराबाबतचा प्रस्ताव मनपाने मंजूर केल्याशिवाय एलबीटी भरणा न करण्याचा निर्णय महासंघाने घेतला होता. अखेर महासंघाच्या मागणीप्रमाणे मनपा प्रशासनाने नव्या दराने एलबीटी भरावी, असे सांगितले. सर्व व्यापारी संघटनांना नव्या दराची प्रत देण्यात आली. संबंधित व्यापाऱ्यांनी त्याप्रमाणे करभरणा करावा, असे आवाहन व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले. प्रास्ताविक दिनेश गिल्डा यांनी केले.