महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिरकरणातर्फे सरळसेवा भरती अंतर्गत तांत्रिक-अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठीच्या परीक्षेत गुणवत्ता आलेल्या उमेदवारांची यादी तसेच कागदपत्रे पडताळणी मे महिनाअखेपर्यंत केली जाणार आहे. त्यासंबंधीची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळांवर देण्यात आली आहे.
तांत्रिक संवर्गाच्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्रे तसेच कागदपत्रांची पडताळणी १६ ते २० मे दरम्यान तर अतांत्रिक संवर्गातील उमेदवारांची पडताळणी प्रक्रिया २१ ते २४ मे दरम्यान केली जाणार आहे. कनिष्ठ लिपिक टंकलेखक या अतांत्रिक संवर्गातील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २७ ते ३१ मे दरम्यान केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी म्हाडाची संकेतस्थळे पाहावीत असे आवाहन करण्यात आले आहे.