वाढती पाणीटंचाई शहरवासीयांच्या चांगलीच अंगवळणी पडली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मराठवाडय़ात ठिकठिकाणी पाणीटंचाईने कहर केला असताना विभागाची राजधानीही पाणीटंचाईने त्रासून गेली आहे. औरंगाबाद शहराच्या शिवाजीनगर भागात महापालिकेचे टँकर वेळेवर येतीलच याची खात्री व अनुभव नाही. त्यापेक्षा पदरमोड करून सामूहिक वर्गणी जमवून खासगी टँकर मागविला जातो. टँकर आल्यावर आपले पाणी अशा रचून ठेवलेल्या मोठय़ा पिंपात भरून घेणे क्रमप्राप्त ठरते.