महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत खान्देशातील २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्रथमश्रेणीचे अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यातील १५ गुणवंत एकटय़ा दीपस्तंभ फाऊंडेशनचे विद्यार्थी आहेत.
सुयोग नगरदेवळेकर (भडगाव), प्रविण चव्हाण (मेहुणबारे), नीलेश अपार (जामनेर) यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. नितीन कटेकर (पारोळा), प्रदीप पाटील (मुक्ताईनगर) यांची सहाय्यक पोलीस आयुक्त तर, नामदेव पाटील (अमळनेर) यांची तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. चेतन राजपूत (वरणगाव), नीलेश कोठावदे (अमळनेर), प्रमोद पाटील (शिरपूर), शरद पाटील (बाळद-भडगाव), राकेश भावसार (चोपडा), प्रशांत पाटील (उंबरखेड-चाळीसगाव), सुहास सोळंखे (धुळे), सुनील गोहील (जळगाव), चंद्रशेखर बोर्डे (औरंगाबाद) यांची सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून निवड झाली आहे. नागनाथ कंजेरी (औरंगाबाद) यांची सहकार उपनिबंधक म्हणून निवड झाली आहे. हे सर्वच्या सर्व येथील दीपस्तंभ फाऊंडेशनचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत खान्देशचे इतके विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दीपस्तंभाच्या चळवळीत शेकडो व्यक्तींनी दिलेल्या योगदानाचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया प्रा. महाजन यांनी व्यक्त केली आहे.