रेल्वे मंत्रालयाने केलेल्या दरवाढीची अंमलबजावणी २१ जानेवारीपासून होत असून या दरवाढीमुळे नागपूर-मुंबई स्लीपर क्लासचा प्रवास ५० रुपयाने तर नागपूर-दिल्ली हा प्रवास सुमारे ६५ रुपयाने महागणार आहे.
अगोदरच महागाईने नागरिक त्रस्त असून त्यात रेल्वे दरवाढीने भर घातली आहे. त्यामुळे रेल्वेप्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. ही दरवाढ २१ जानेवारीपासून होणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी केली. या दरवाढीमुळे स्लीपर क्लासमधून मुंबईचा प्रवास करण्यासाठी ५० रुपये अधिक मोजावे लागणार असून एसीने प्रवास करणाऱ्यांना ८३ रुपये जास्त द्यावे लागणार आहे. २०११ च्या रेल्वे अर्थसंकल्पात एसीच्या प्रवास भाडय़ात वाढ झाली होती. एसीने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी असून वर्षांतून एक किंवा दोन वेळा प्रवास करणारे ५ टक्के प्रवासी आहेत. केवळ व्यापारी, मंत्री, अधिकारीच एसीने प्रवास करतात. त्यामुळे एसीच्या भाडय़ात वाढ केली असली तरी सर्वसामान्यांना त्याचा काही फरक पडणार नसल्याची चर्चा आहे.
सध्याचे प्रवास भाडे (नागपूरवरून)                                          दरवाढीनंतरचे संभावित भाडे
स्थानक   स्लीपर   एसी०१   एसी-२   एसी-३              स्थानक    स्लीपर        एसी०१       एसी-२         एसी-३    
मुंबई      ३२३    २२८०    १३३५    ८८४    मुंबई      ३७३.२२     २३६३.७०     १३८५.२२      ९६७.७०
दिल्ली      ३७१    २६९५    १५७०    १०२५              दिल्ली      ४३६.४०      २८०४         १६३५.४०      ११३४
पुणे       ३३३     —     १३८५    ९१४                  पुणे       ३८६.४०       —          १४३८.४०      १००३
चेन्नई      ३७१    २६९५    १५७०    १०२५              चेन्नई      ४३६.६४      २८०४.४०     १६३५.६४      ११३४.४०  
हैदराबाद   २६४    १७९५    १०६०     ७१४    हैदराबाद  २९९.२२     १८५३.७०       १०९५.२२      ७७२.७०