तिकीट दरवाढ टळल्याने रेल्वेप्रवाशांना दिलासा

काँग्रेसप्रणित आघाडी सरकारने जाता जाता तीन महिन्यात दुसऱ्यांदा रेल्वे प्रवास दरवाढ करून नागरिकांना ‘जोर का झटका’ दिला जाणार होता.

काँग्रेसप्रणित आघाडी सरकारने जाता जाता तीन महिन्यात दुसऱ्यांदा रेल्वे प्रवास दरवाढ करून नागरिकांना ‘जोर का झटका’ दिला जाणार होता. मात्र, ही दरवाढ टळली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 रेल्वे मंडळाने केलेली ही दरवाढ तब्बल १४.२ टक्के होती. तीन महिन्यांपूर्वी अंतरिम अंदाजपत्रकात प्रवासी दरात वाढ केली होती. त्यानंतर आघाडी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक झाली व त्यानंतर लगेचच रेल्वे मंडळाची बैठक झाली आणि त्यात दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या २० मेपासून तो अंमलात येणार होता. मूळ रेल्वे भाडय़ाच्या दहा टक्के अधिक रक्कम व ४.२ टक्के इंधन समायोजन अधिभार, अशी ही एकूण १४.२ टक्के दरवाढ आहे. दूर अंतरावर प्रवास करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागणार आहे. ही नवी दरवाढ २० मेपासून अंमलात आणली जाणार होती, ज्यांनी आधीच तिकिटे काढली आहेत त्यांच्याकडून प्रवासादरम्यान ही फरकाची रक्कम तिकीट तपासणीस वसूल केली जाणार होती.
नागपूरहून मुंबईचे वातानुकूलित प्रथम श्रेणीचे भाडे २ हजार ४६० रुपयांहून २ हजार ८०५ रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार ४५५ रुपयांहून १ हजार ६५९ रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे १ हजार २० रुपयांहून १ हजार १६५ रुपये, स्लीपरचे भाडे ३९५ रुपयांवरून ४५१ रुपये होणार होते. मुंबईचे दुरांतोने वातानुकूलित प्रथम श्रेणीचे भाडे २ हजार ७९५ रुपयांहून ३ हजार १९५ रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार ६४० रुपयांहून १ हजार ८७३ रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे १ हजार १६५ रुपयांहून १ हजार ३३९ रुपये, स्लीपरचे भाडे ४३० रुपयांवरून ४९१ रुपये होणार होते.
नागपूरहून जयपूरचे वातानुकूलित प्रथम श्रेणीचे भाडे २ हजार ९१५ रुपयांहून ३ हजार ३२९ रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार ७१० रुपयांहून १ हजार ९३३ रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे १ हजार १९५ रुपयांहून १ हजार ३६५ रुपये, स्लीपरचे भाडे ४६५ रुपयांवरून ५३९ रुपये करण्यात येणार होते. नागपूरहून पुणेचे वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार ५१० रुपयांहून १ हजार ७२५ रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे १ हजार ३४५ रुपयांहून १ हजार ५३६ रुपये, स्लीपरचे भाडे ५१५ रुपयांवरून ५८८ रुपये होणार होते. नागपूर ते सिकंदराबादचे वातानुकूलित प्रथम श्रेणीचे भाडे १ हजार ९१५ रुपयांहून २ हजार १८७ रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार १४५ रुपयांहून १ हजार ३०८ रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे ८१० रुपयांहून ९२५ रुपये, स्लीपरचे भाडे ३९५ रुपयांवरून ३६० रुपये होणार होते.  
नागपूर ते नवी दिल्लीचे वातानुकूलित प्रथम श्रेणीचे भाडे २ हजार ९१५ रुपयांहून ३ हजार ३२९ रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार ७१० रुपयांहून १ हजार ९३३ रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे १ हजार १९५ रुपयांहून १ हजार ३६५ रुपये, स्लीपरचे भाडे ४६५ रुपयांवरून ५३१ रुपये आकारण्यात येणार होते. नागपूर ते जबलपूरचे वातानुकूलित प्रथम श्रेणीचे भाडे १ हजार ८५० रुपयांहून २ हजार ११३ रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार  १०५ रुपयांहून १ हजार २६२ रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे ७८५ रुपयांहून ९०० रुपये, स्लीपरचे भाडे ३०५ रुपयांवरून ३४९ रुपये होणार होते.
नागपूर ते बंगळुरूचे वातानुकूलित प्रथम श्रेणीचे भाडे ३ हजार ७० रुपयांहून ३ हजार ५०६ रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार ७९५ रुपयांहून २ हजार ५० रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे १ हजार २५० रुपयांहून १ हजार ४२८ रुपये, स्लीपरचे भाडे ४८० रुपयांवरून ५४८ रुपये झाले आहे. नागपूर ते चेन्नईचे वातानुकूलित प्रथम श्रेणीचे भाडे २ हजार ९१५ रुपयांहून ३ हजार ३२९ रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार ७१० रुपयांहून १ हजार ९३३ रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे १ हजार १९५ रुपयांहून १ हजार ३६५ रुपये, स्लीपरचे भाडे ४६५ रुपयांवरून ५३९ रुपये होणार होते. नागपूर ते हैदराबादचे वातानुकूलित प्रथम श्रेणीचे भाडे १ हजार ९४० रुपयांहून २ हजार २१६ रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे भाडे १ हजार १५५ रुपयांहून १ हजार ३१९ रुपये, वातानुकूलित तृतीयचे भाडे ८२० रुपयांहून ९३७ रुपये, स्लीपरचे भाडे ३१५ रुपयांवरून ३६० रुपये होणार होते. प्रवास दरवाढीबाबत निर्णय झाला होता. मात्र नवे सरकार सत्तेवर येणार असल्यामुळे हा निर्णय थांबविण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nagpur railway news