यादीची वाट बघून थकलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नीने भरला अर्ज

अनेक दिग्गजांना डावलले

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात झालेल्या नेत्याच्या प्रचंड इनकमिंगमुळे भाजपातील अनेक निष्ठावंताची उमेदवारी गेली आहे. यात खडसे, तावडेंपासून ते अनेक विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळ ठेवले असून, यादीची वाट बघून थकलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होईल. पण त्याआधी उमेदवारीवरून चांगलेच नाट्य रंगले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांना भाजपाने डच्चू दिला आहे. सर्व मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही भाजपाने नागपूरमधील कामठी मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय बराच ताणून धरला आहे.

आणखी वाचा : विनोद तावडे म्हणतात, ‘तिकीट का मिळाले नाही याबद्दल अमित भाईंशी चर्चा करेन पण…’

ऐनवेळी खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे बावनकुळे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्याबाबतही लवकर निर्णय होत नसल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. ज्योती बावनकुळे यांचा अर्ज दाखल झाला असली, तरी कामठी मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार कोण असेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wife of state minister and sitting bjp mla chandrashekhar bawankule files nomination as independent candidate bmh

ताज्या बातम्या