‘रंगपीठ, मुंबई’ या संस्थेतर्फे दरडवाडी (ता. केज, जि. बीड) येथे २, ३ आणि ४ मार्च रोजी तिसऱ्या राष्ट्रीय भारूड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाटय़विद्यालयाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी त्यांचे वडील व भारूड कलावंत कै. माधवराव केंद्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा महोत्सव सुरू केला  आहे. यावेळी एका परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीपासून वारकरी संप्रदायावर आधारीत लोककलांतील कलावंतांना किंवा संतसाहित्यात मोलाचे योगदान दिलेल्या अभ्यासकास विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा महोत्सव स्पर्धात्मक स्वरूपाचा असून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या भारूड संघांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येतील. याशिवाय उत्तम कलावंत, गायक, वादक व नर्तक यांनाही वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत. या महोत्सवासाठी प्रवेश अर्जाची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी ही आहे. संपर्क : अशोक केंद्रे- ९९२०१२२१९७.