‘श्री हनुमान मारुती देवस्थान’ आणि ‘नववर्ष स्वागत यात्रा समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडय़वानिमित्त बदलापूर येथे आयोजित कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमांतर्गत संस्थेच्या वतीने अलिकडेच भजन स्पर्धा आणि देशभक्तीपर समुह गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुधवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता गांधी चौकातील हनुमान मारुती देवस्थान येथे ‘रामकृष्ण व विवेकानंद’ या विषयावर इतिहासतज्ञ दुर्गेश परुळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच रात्री ९ वाजता येथील गांधी चौकात आतषबाजी करण्यात येणार आहे. यांनतर दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ६.३० वाजता मांजर्ली येथील गणेश चौकातून नववर्ष स्वागत यात्रेस सुरुवात होणार आहे. नागरिकांना अधिकाधिक संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अंबरनाथमध्ये दीपोत्सव
अंबरनाथ शहरात गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला शिवाजी चौकात दीपोत्सव करून आवाजरहीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. प्राचीन शिवमंदिरात जलाभिषेक करून नव वर्ष स्वागत यात्रेस सुरूवात होईल. शहराच्या पूर्व विभागातील विविध मंदिरातून निघणाऱ्या उपयात्रा हेरंब मंदिरात सकाळी साडेसात वाजता येणार आहेत. पश्चिमेकडच्या उपयात्रा महात्मा गांधी विद्यालयात येणार आहेत. दोन्ही ठिकाणांहून सकाळी ८.३० वाजता यात्रा निघणार आहेत. हुतात्मा चौकात या स्वागत यात्रेचा समारोप होईल. सकाळी आठ वाजता आयुध निर्माणी कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून दुचाकी स्वारांची रॅली निघून नगर प्रदक्षिणा घालणार आहेत.
स्वागत यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष बळीराम साबे आणि कार्याध्यक्ष पद्माकर रहातेकर यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2013 रोजी प्रकाशित
नववर्षांनिमित्त बदलापूर व अंबरनाथमध्ये कार्यक्रम
‘श्री हनुमान मारुती देवस्थान’ आणि ‘नववर्ष स्वागत यात्रा समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडय़वानिमित्त बदलापूर येथे आयोजित कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
First published on: 09-04-2013 at 01:37 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year programme in badlapur and ambarnath