येथील चित्रकार अनिकेत महाले यांच्या ‘ऑन दी स्पॉट’ निसर्गचित्राचे प्रदर्शन २२ ते २६ जानेवारी या कालावधीत येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या छंदोमयी दालनात होणार आहे.
बुधवारी सकाळी ११.३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार केशव मोरे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी ‘गांवकरी’चे संपादक वंदन पोतनीस, लोकमत समुहाचे भिकुलाल चांडक, वास्तुविशारद धनंजय शिंदे, नृत्यांगणा रेखा नाडगौडा, विक्रम उगले उपस्थित राहणार आहेत. नवोदित चित्रकारांना मोरे यांच्या व्यक्तीचित्रणाचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. २३ व २४ जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच या कालावधीत हे प्रात्यक्षिक सुरू राहणार आहे. चित्र प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८.३० कालावधीत सुरू राहील. प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.