हरणाचे कातडे विकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५५ हजार रुपये किमतीचे हरणाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. अमित बाबासाहेब पाटील असे आरोपीचे नाव आहे.    
अमित पाटील (वय २१, रा.मणेरे हायस्कूलजवळ, कबनूर, ता.हातकणंगले) हा राज हॉटेल येथे हरणाची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. तो या परिसरात आल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडे तपासणी केली असता ५५ हजार रुपये किमतीचे हरणाचे कातडे आढळले. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.