खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जनावरांसाठी लाळ, खुरकुत लसीकरण शिबिरात एक हजार जनावरांना फायदा झाला. शिबिरास पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
परळी येथे खासदार मुंडे यांच्या ६३व्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव यांच्या हस्ते झाले. संचालक भाऊसाहेब घोडके, ज्ञानोबा मुंडे, वैद्यनाथ बँकेचे संचालक रमेश कराड, कार्यकारी संचालक अशोक पालवे आदी उपस्थित होते. शिबिरात १ हजार जनावरांना लसीकरण, २३५ औषधोपचार, गर्भतपासणी २५, वातीच्या शस्त्रक्रिया २७, पोटाच्या शस्त्रक्रिया २, नेत्र शस्त्रक्रिया १, शिंगाच्या कर्करोगाची १ शस्त्रक्रिया करण्यात आली. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. बी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. डी. तांदळे, पशुसंवर्धक आयुक्त डॉ. एन. बी. आघाव आदी उपस्थित होते.