महावितरणच्या ग्राहकांना एकाच खिडकीवरून सर्व सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या समस्यांसंबंधी तसेच इतर अर्ज स्वीकारण्याचे काम सोयीचे व्हावे यासाठी महावितरणने एक खिडकी योजना डोंबिवली एमआयडीसीतील त्यांच्या कार्यालयात सुरू केली आहे.
या खिडकीवरून ग्राहकांचे अर्ज स्वीकारणे, त्या अर्जाचे निराकरणाचे उत्तर, मीटर चालू अथवा बंद करणे, पत्ता बदल आदी सुविधा देण्यात येणार आहेत, असे कार्यकारी अभियंता राजेंद्र मशाळकर यांनी सांगितले. ग्राहकांना महावितरणकडून सुविधा घेताना हेलपाटे मारण्यास लागू नयेत. त्यांचे काम एका फेरीत व्हावे हा यामागील उद्देश असल्याचे मशाळकर म्हणाले.