निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ३१ व्या कारंजा लाड शाखेचे उद्घाटन उद्या रविवारी, २० जानेवारीला दुपारी १२ वाजता आमदार प्रकाश डहाके यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा लाडचे नगराध्यक्ष संजय काकडे राहतील. पाहुणे म्हणून वाशीम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरुण ताथोड, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, दत्तराज डहाके, भास्करराव क ऱ्हे, मो. युसूफ मो. सफी पुंजाणी, उद्योगपती श्यामसुंदर मालपाणी, शिरीष चवरे उपस्थित राहणार आहेत. सामाजिक विकास साधणारी आपली हक्काची सोसायटी म्हणून निर्मल उज्ज्वलकडे आदराने बघितले जाते. संस्थेने आता देशपातळीवर संस्थेने झेप घेतली आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशात संस्थेने वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. कारंडा लाड परिसरातील नागरिक समाजसेवेच्या आमच्या उद्देशाला बळ देतील, असा विश्वास संस्थेचे सचिव प्रमोद मानमोडे यांनी व्यक्त केला. कारंजा लाड शाखेच्या उद्घाटन प्रसंगी निर्मल उज्ज्वल सोसायटीने विशेष ठेव योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार २०० दिवसांसाठी १०.५० टक्के, १८ महिन्यांसाठी ११.२५ टक्के तर १३ महिन्यांसाठी ११ टक्के दराने व्याज दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना .५ टक्के व्याज अधिक दिले जाणार असल्याचे मानमोडे म्हणाले. कारंजा लाडच्या जयस्तंभ चौकातील इन्नाणी कॉम्प्लेक्समध्ये ही शाखा सुरू होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2013 रोजी प्रकाशित
आज ‘निर्मल उज्ज्वल’च्या कारंजा लाड शाखेचे उद्घाटन
निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ३१ व्या कारंजा लाड शाखेचे उद्घाटन उद्या रविवारी, २० जानेवारीला दुपारी १२ वाजता आमदार प्रकाश डहाके यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा लाडचे नगराध्यक्ष संजय काकडे राहतील.
First published on: 20-01-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of nirmal ujwal karanja lad branch today