महानगरपालिका क्षेत्रातील ऑटोला इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करण्यात आली असून ३० एप्रिल २०१३ च्या पहिले सर्व ऑटोचालकांनी मिटर लावण्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी.डी. गुंडावार यांनी दिले आहेत.  औद्योगिकदृष्टय़ा प्रगत या शहराची लोकसंख्या चार लाखाच्या जवळ आहे. लोकसंख्येच्या तुलनेत अधिक पटीने या शहरात तीन हजार आटो आहेत.
या ऑटोंना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्यात आलेले आहे. परंतु ऑटो चालक मालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या सक्तीला धुडकावत ऑटोला मीटर लावलेले नाहीत. त्यामुळे आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी.डी. गुंडावार यांनी नव्याने सक्तीचे आदेश काढताना ३० एप्रिलच्या पहिले महापालिका क्षेत्रातील सर्व ऑटोला इलेक्ट्रालिक मीटर लावने सक्तीचे केले आहे. जो ऑटोचालक मीटर लावणार नाही त्याला दंड करण्यात येईल, असेही परिवहन विभागाने म्हटले आहे.
 उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या निदेशानंतर प्रत्यक्षात १ जुलै रोजी शहरातील सर्व ऑटोला मीटर लावणे आवश्यक होते. परंतु आरटीओ कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले. आता पुन्हा एकदा ऑटो चालकांना यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत. अवघ्या दहा किलोमीटर अंतराच्या या शहरात मीटर भाडे परवडत नाही, अशी ऑटो चालकांची ओरड आहे.
 ग्राहक मिटरच्या रिडींग प्रमाणे पैसे देणार नाहीत असेही त्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ऑटो चालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसुली करतात. त्यावर र्निबध लादण्यासाठी म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर न लावणाऱ्या ऑटोचालकांना सक्ती केल्याने आता ऑटोचालकांनी त्याविरुद्ध ओरड सुरू केली आहे.    
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी.डी. गुंडावार यांनी नव्याने सक्तीचे आदेश काढताना ३० एप्रिलच्या पहिले महापालिका क्षेत्रातील सर्व ऑटोला इलेक्ट्रालिक मीटर लावने सक्तीचे केले आहे. जो ऑटोचालक मीटर लावणार नाही त्याला दंड करण्यात येईल.