उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांची पुणे येथील यशदात बदली झाली. त्यानंतर जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांची येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ७ फेब्रुवारीला राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. डॉ. नागरगोजे यांची यशदात महासंचालक म्हणून बदली झाली. जालन्याचे ‘सीईओ’ बी. राधाकृष्णन यांची नाशिकला जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. सोमवारी राधाकृष्णन यांची तेथील नियुक्ती रद्द करून उस्मानाबादचे जिल्हाधिकारी येथे तत्काळ रूजू व्हावे, असे आदेश देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद जि. प.चे ‘सीईओ’ एस. एल. हरिदास यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नंदुरबार येथे जिल्हाधिकारी यांचे सहायक असलेल्या सुमन रावत रूजू झाल्या. त्या मूळच्या उत्तराखंडच्या आहेत. रावत यांच्यापाठोपाठ जिल्हाधिकारी राधाकृष्णन हेही आयएएस दर्जाचे अधिकारी उस्मानाबादला लाभल्यामुळे पुन्हा डॉ. प्रवीण गेडाम व चंद्रकांत गुडेवार यांच्याप्रमाणे लोकाभिमुख कामाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.