पुढील काळात नरेंद्र मोदींसारख्या जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन आ. जयप्रकाश छाजेड यांनी केले आहे. मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्याकरिता मजबूत संघटनची आवश्यकता असून पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी कामाला लागावे असे आवाहन आ. छाजेड यांनी केले आहे. अॅड. छाजेड यांनी आगामी काळात संघटना मजबूत करण्यासंबंधी सूचना दिल्या.
यावेळी महिला काँग्रेस शहराध्यक्षा वत्सलाताई खैरे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनिफ बशीर आदींनी मनोगत व्यक्त केले. आयोजक ब्लॉक अध्यक्ष अशोक गोसावी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जावेद इब्राहिम यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2013 रोजी प्रकाशित
‘नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे’
पुढील काळात नरेंद्र मोदींसारख्या जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन आ. जयप्रकाश छाजेड यांनी केले आहे. मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
First published on: 15-06-2013 at 02:37 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party workers should be ready to stop narendra modi