पवन राजेिनबाळकर यांची हत्या कोणी केली, हे लोकांना ठाऊक आहे. न्यायालयाच्या माध्यमातून आता केवळ आरोपीच्या नावावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. सीबीआयने त्यांच्या दोषारोपपत्रात पवनराजे यांचे मारेकरी म्हणून खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना क्रमांक एकचा आरोपी केले आहे. या मारेकऱ्यांना गजाआड झालेले बघायचे आहे, असे आमदार राजेिनबाळकर यांनी सांगितले.
येथील राजे कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. अलिबाग न्यायालयातून पवनराजे हत्या प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आले. त्यावर खासदार डॉ. पाटील यांच्या वकिलाने दिलासा मिळाल्याचे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयात वर्ग केले. याचा अर्थ अलिबाग न्यायालयात प्रक्रिया सुरू असताना, साक्षीदारांवर दबाव येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. ४३ पकी १२ साक्षीदार फुटले. त्यामुळेच हे प्रकरण खासदार डॉ. पाटील यांचा प्रभाव राहणार नाही, अशा ठिकाणी अथवा अन्य राज्यात वर्ग करण्यात यावे, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती. या प्रकरणाशी निगडित बहुतेक कागदपत्रे मराठी भाषेत आहेत. त्यामुळे पुढील प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नवी दिल्ली अथवा मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्याबाबत सुचविले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईत हे प्रकरण चालविण्यास आम्ही होकार दिला असल्याचेही राजेिनबाळकर यांनी सांगितले. आता प्रक्रिया वेगात होऊन या प्रकरणातील आरोपी गजाआड झाल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.