माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती न देणाऱ्या तालुक्यातील दाभाडी येथील के. जे. निकम विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मानकर यांना राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाचे आयुक्त पी. डब्लू. पाटील यांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
विद्यालय प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी सेवा समाप्त केलेले कर्मचारी पुरुषोत्तम धांडे यांनी मुख्याध्यापक मानकर यांच्याकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवली होती. परंतु ३० दिवसांत ही माहिती प्राप्त न झाल्याने प्रथम अपील करण्यात आले होते. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने राज्य माहिती आयुक्तांकडे द्वितीय अपील करण्यात आले. अपीलकर्ता हे शाळेचे सेवा समाप्त कनिष्ठ लिपिक असून सेवा समाप्तीनंतर त्यांनी प्रभारी मुख्याध्यापकांकडे शालेय दप्तर सुपूर्द केले नाही. तसेच तत्कालीन मुख्याध्यापक वाल्मीक नंदन यांचीदेखील सेवा समाप्त झाली असून त्यांनीही कार्यभार दिलेला नाही. त्यामुळे माहिती उपलब्ध नसल्याने अर्जदाराला माहिती देता आली नसल्याचा पवित्रा मुख्याध्यापक मानकर यांनी सुनावणी दरम्यान घेतला. हे स्पष्टीकरण माहिती आयुक्तांनी अमान्य करत मानकर यांना पाच हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईचा आदेश दिला. माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी पगाराच्या रकमेतून ही रक्कम वसूल करण्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Penalty to information commission bench chairman
First published on: 30-04-2015 at 07:52 IST