राज्य सरकारतर्फे आयोजित ५२ व्या राज्य नाटय़ महोत्सवात सादर झालेल्या ‘पुस्तकाच्या पानातून’ या नाटकास सांघिक प्रथम पुरस्कारासह पाच पुरस्कार प्राप्त झाले. मुंबई येथे होणाऱ्या नाटय़ अंतिम फेरीसाठी या नाटकाची निवड झाली.
नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात राज्यनाटय़ महोत्सवाची प्राथमिक फेरी पार पडली. या फेरीत राजीव गांधी युवा फोरम, परभणी या संस्थेकडून सादर झालेल्या प्रा. रविशंकर झिंगरे लिखित, तसेच किशोर पुराणिक दिग्दर्शित ‘पुस्तकाच्या पानातून’ हे नाटक सादर करण्यात आले. संजय पांडे निर्मित या नाटकामधील किशोर पुराणिक यांना अभिनय व दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. दिगंबर दिवाण यांना प्रथम, तर त्र्यंबक वडसकर व बालनाथ देशपांडे यांना नेपथ्याचे द्वितीय पारितोषिक मिळाले. नाटकात अर्चना चिक्षे व सुनील ढवळे यांचय भूमिका आहेत. पाश्र्वसंगीत मनीष गव्हाणे व उदय कात्नेश्वरकर यांनी दिले. रंगभूषा व वेशभूषासाठी अनेक कलाकारांनी साह्य़ केले आहे.