२६व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिक परिक्षेत्र संघात नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या खेळाडूंचा आयुक्तांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
सतत तीन वर्षांपासून सुवर्णपदक पटकाविणारे शिपाई तुषार माळोदे यांनी १०० किलो वजन गटात ज्युदोमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण मिळविले. बॉक्सिंगमध्ये ७५ किलो गटात शिपाई मीनाक्षी तोंडे यांनी रौप्य, मोहिनी चव्हाण यांनी ५७ किलो वजन गटात कांस्य तसेच ज्युदोमध्ये शिपाई सुनीता साबले यांनी ७० किलो वजन गटात कांस्य मिळविले. सांघिक खेळात हॅण्डबॉलमध्ये प्रशिक्षक पोलीस नाईक अश्पाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई राकेश बनकर, ज्ञानेश्वर कहांडळ, संतोष उशीर, गिरीश महाले, गौरव गवळी, विशाल काठे यांसह इतरांनी रौप्य प्राप्त केले. बनकर व उशीर यांची केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच अश्पाक शेख यांची महाराष्ट्र हॅण्डबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
राधिका कुमावत यांनी मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व खेळाडूंचा आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त संदीप दिवाण, साहाय्यक आयुक्त पंकज डहाणे यांच्या उपस्थितीत विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2014 रोजी प्रकाशित
पोलीस आयुक्तालयातील गुणवंत खेळाडूंचा गौरव
२६व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिक परिक्षेत्र संघात नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या खेळाडूंचा आयुक्तांच्या

First published on: 18-01-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police sports person felicitated