शहर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संस्थापक संचालक प्रा. मुकुंद घैसास व उपाध्यक्षपदी रेश्मा चव्हाण-आठरे यांची शनिवारी एकमताने निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात घैसास व श्रीमती चव्हाण यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी प्रा. घैसास यांचा एकमेव अर्ज होता, त्यांच्या नावाची सूचना मावळते अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी केली तर गिरीश घैसास यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी श्रीमती चव्हाण-आठरे यांच्या नावाची सूचना मावळते उपाध्यक्ष शिवाजी कदम यांनी केली, त्यास संचालक अॅड. लक्ष्मण वाडेकर यांनी अनुमोदन दिले.
यावेळी प्रा. घैसास व चव्हाण-आठरे यांचा निवडीबद्दल गुंदेचा व कदम यांनी सत्कार केला. संचालक डॉ. रावसाहेब अनभुले, सतीश अडगटला, मच्छिंद्र क्षेत्रे, आसाराम कावरे, अशोक कानडे, संजय घुले, सुरेखा विद्ये, डॉ. विजयकुमार भंडारी, सुनिल फळे, सुजित बेडेकर, जयंत यलूलकर, सेवक प्रतिनिधी, राजु विद्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर कुलकर्णी, विशेष कार्यकारी अधिकारी जवाहर कटारिया आदी उपस्थित होते.