आष्टी तालुक्यातील कडा ते देवळाली या रस्त्याच्या हॉटमिक्स कामासाठी नाबार्ड अंतर्गत ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील कडा ते देवळाली हा १७ किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याचे ‘हॉटमिक्स’ करण्यासाठी ‘नाबार्ड’ अंतर्गत तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती धस यांनी दिली.