यवतमाळची सध्या विकासाकडे झपाटय़ाने वाटचाल सुरू आहे. यवतमाळ शहरापासून औद्योगिक वसाहतीला जोडणारा रस्ता नुकताच केंद्रीय मार्ग निधीतून साकारला असून या रस्त्याने वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली आहे.   
केंद्र शासनाच्या मार्ग परिवहन मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय मार्ग निधी ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या यवतमाळ बसस्थानक ते एमआयडीसी लोहारापर्यंतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. केंद्राकडून मंजुरी मिळताच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. ८ कोटी रुपये किमतीच्या या कामातून ५ किलोमीटपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. पवर्ूी हा रस्ता केवळ ७ मिटरचा होता.  जडवाहनांसह चारचाकी व दुचाकी  वाहने रस्त्यावरून धावत असल्याने  या मुख्य मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. आता ही वाहतूक कोंडी सुटली आहे. पाचही किलोमीटरच्या रस्त्यावर विविध प्रकारची ९०० झाडेही लावण्यात आली आहेत.