जांभुळणी (ता. आटपाडी) गावच्या शिवारात असलेल्या एकाकी वस्तीवर शनिवारी पहाटे ७ ते ८ जणांच्या टोळीने दरोडा टाकून अडीच लाख रुपयांची लूट केली आहे. पती-पत्नीला पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून अज्ञातांनी ही लूट केली असून लुटीसाठी अमावस्याचा मुहूर्त साधल्याने या कृत्यामागे पारधी असावेत असा पोलिसांचा कयास आहे.
महादेव राजाराम जुगदर यांची वस्ती जांभुळणी गावापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील ७ ते ८ जणांची टोळी आली. त्यांनी चाकूचा व काठीचा धाक दाखवून जुगदर व त्यांच्या पत्नीस घरासमोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये कोंडले. घरातील विजेचे बल्ब बंद करून दोन लाख रुपयांची रोकड आणि १ तोळा वजनाचे सोने, दोन मोबाईल असा ऐवज लंपास केला.
हा प्रकार आजूबाजूचे शेतकरी रानात आल्यानंतर लक्षात आला. कोंडलेल्या जुगदर यांची सुटका केल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाची मदत घेतली. मात्र या पथकाने मुख्य रस्त्यापर्यंत माग दाखविला. या प्रकारामुळे वस्तीवर राहणाऱ्या लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आटपाडी पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र कुलकर्णी करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Oct 2013 रोजी प्रकाशित
आटपाडीजवळ दरोडा; अडीच लाखांची लूट
जांभुळणी (ता. आटपाडी) गावच्या शिवारात असलेल्या एकाकी वस्तीवर शनिवारी पहाटे ७ ते ८ जणांच्या टोळीने दरोडा टाकून अडीच लाख रुपयांची लूट केली आहे.

First published on: 06-10-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in atpadi