मराठीची गळचेपी करणाऱ्या डोंबिवलीतील रॉयल कॉलेजने नुकतीच एक विशेष बैठक घेऊन आपण यापुढे मराठीची गळचेपी होऊ देणार नाही, तसेच मराठी विषयास अकरावी प्रवेशाच्या वेळी प्राधान्य दिले जाईल, असा ठराव पास केला. या बैठकीस आ. रमेश पाटील, शिक्षणतज्ज्ञ सुरेन्द्र बाजपेयी, मनसे शहराध्यक्ष राजेश कदम, मनसेच्या विद्यार्थी विभागाचे पदाधिकारी वेद प्रकाश पांडे, समीर पालांडे, महाविद्यालयाचे विश्वस्त रजनीकांत शहा, प्राचार्य दिनेशचंद्र तिवारी आदी उपस्थित होते. प्राचार्य तिवारी यांची ताबडतोब बदली करा, या मागणीला बैठकीच्या मध्यस्तांनी तूर्त लांबणीवर टाकले असल्याचे पांडे यांनी सांगितले.