दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीतर्फे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना बुधवारी वरळी येथे दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात ‘हिरकणी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये माजी महापौर अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री सुषमा देशपांडे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड. विजया बांगडे, कवयित्री श्रद्धा बेलसरे-खारकर, लेखिका शुभांगी भडभडे, अंध पत्रकार अनुजा संखे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, सुशीला साबळे, सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. साधना झाडबुके यांचा समावेश होता.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, वैजयंती कुलकर्णी-आपटे, श्री. वि. देशपांडे यांच्यासह स्वतंत्र निवड समितीने या पुरस्कारासाठी महिलांची निवड केली.
या कार्यक्रमाचा वृत्तान्त ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2014 रोजी प्रकाशित
‘सह्यद्री’ वाहिनीचे ‘हिरकणी’ पुरस्कार प्रदान
दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीतर्फे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना बुधवारी वरळी येथे दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात ‘हिरकणी’ पुरस्कार देऊन
First published on: 01-03-2014 at 12:56 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahyadri hirkani awards distributed