राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदासांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी श्रीसमर्थ दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही श्री समर्थाच्या पादुकांचे वास्तव्य २२ जानेवारीपर्यंत ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे (प.) येथे असून भाविकांनी समर्थाच्या पादुकांचे दर्शन, पूजन, आणि सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे व्यवस्थापक मोहनबुवा रामदासी यांनी केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी वापरलेल्या मूळ पादुका अधिष्ठान रूपाने असून समर्थाचे वंशज आणि सज्जनगडावरील ४० रामदासी दौऱ्यासमवेत आले आहेत.