लक्ष्मण जगताप मित्र परिवार, प्रतिभा महिला प्रतिष्ठान व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवीत गुरूवार २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा ‘नाद संस्कृती’ हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान रविशंकर यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
आमदार लक्ष्मण जगताप व समन्वयक वसंत सानप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांगवी मैदानात २२ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता देशभरातील विविध प्रांतांचे कलाकार संगीत, नृत्य व वाद्य यांचा आविष्कार सादर करणार आहेत. या वेळी रविशंकर साधकांना मार्गदर्शन करणार असून त्यानंतर मानपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. यासंदर्भात, संपर्कासाठी कुकुम नरेश (९८२३३७३८९७) व राजकुँवर राणे (९८८१७२१९१३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.