सामाजिक बांधिलकीतून महिलासंह युवकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने सात्त्विक समूहाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आज समारोप झाला. वित्त सेवाक्षेत्रातील सात्त्विक फोयनान्शियल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड ही मध्य भारतातील आघाडीची संस्था असून वर्धापनदिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम सात्विकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमोल ढाके यांनी प्राधान्याने राबविले. सलग सात दिवस जनजागृती अभियान, पर्यावरण जागृती अभियान, फुटाळा तलावाची स्वच्छता आदी उपक्रम आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सात्विक बुल्स आणि नागपूर एकादश दरम्यान फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला. रविवारी फुटाळा तलावाची स्वच्छता करून सात्विकच्या कर्मचाऱ्यांनी निसर्ग स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थी, वार्षिक नियोजनासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यशाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात्त्विक समूहाचे साडेदहा हजार ग्राहक असून, त्यांचे कंपनीच्या माध्यमातून आर्थिक नियोजन करण्यात येत आहे.
कंपनीतर्फे ’माय फोयनान्सप्लॅनर डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीवर सल्ला दिला जात आहे. विद्यमान स्थितीत महाराष्ट्रात माय फोईन प्लॅनरच्या ५० फ्रें चाइसी कार्यरत आहेत. दोन वर्षांत भारतात सर्वत्र फ्रे न्झायजी करण्यात येतील, अशी माहिती अमोल ढाके यांनी दिली. कंपनीने नुकतेच सात्त्विक इन्स्टिटय़ूट ऑफ  अ‍ॅडव्हान्स लर्निग हा उपक्रम सुरू करून शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले आहे. या माध्यमातून एफ पीएसबीच्या माध्यमातून सीएफ पीचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. संपूर्ण उपक्रमांसाठी संचालक नीरज मुद्देश्वर, स्पेक्ट्रमचे संचालक प्रमोद कोरडे आणि सात्विक समूहाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.