* तळपत्या उन्हाने बाष्पीभवनाचा वेग वाढला
* नागपूर-अमरावती विभागात जलसाठे घटले
राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळच्या झळा सोसत आहेत. विदर्भातही यावर्षी अभूतपूर्व जलसंकटाची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यात आहे. संपूर्ण जिल्ह्य़ाचा विचार करता नागपुरातील मोठय़ा प्रकल्पात जास्तीत जास्त ३५ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध असून मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १६ टक्केच पाणी शिल्लक आहे. हे प्रमाण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय कमी असून दोन महिने अजून उन्हाळा राहणार आहे. त्यामुळे विदर्भात चिंताजनक परिस्थती निर्मा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मराठवाडय़ात जनता दुष्काळाने त्रस्त  झाली असून पश्चिम महाराष्ट्रातही त्याचे चटके बसत आहेत. वाढती लोकसंख्या आमि उद्योगांच्या पाश्र्वभूमीवर यावर्षीचा उन्हाळी चांगलच जड जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. शेती आणि उद्योगांना पिण्याच्या पाण्याबरोबरच ‘वॉटर कंझव्‍‌र्हेशन’साठी ककंबर कसावी लागेल. असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. यावर्षी उन्हाळा उशिरा सुरू होऊन देखील पाण्याची स्थिती अतिशय खराब असलेल्याचे दिसून येत आहे.नागपूर विभागात१६ मोठय़ा प्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मोठे सिंचन प्रकल्पही आटण्याच्या मार्गावर असून नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पात तोतलाडोह ४२ टक्के, कामठी खैरी ६३ टक्के, रामटेक २४ टक्के, लोवरनांद १ टक्का, वडगाव २६ टक्के, इटियाडोह१६ टक्के, रिपूर १९ टक्के, पुजारी टोला १९ टक्के, कालीसरार ० टक्के, मेंढा २३ टक्के, दिना ० टक्के, बोर १४ टक्के, धाम १७ टक्के, पोथरा १७ टक्के,  लोअर वर्धा पहिला टप्पा ४५ टक्के, गोसीखुर्द पहिला टप्पा ६५ टक्के, धरणसाठा उपलब्ध आहे. तर विभागातील ४० टक्के मध्यम प्रकल्पातफक्त ३१ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर पाण्याची मागणी  आणि धरण साठय़ांचे होणारे बाष्पीभवन यामुळे मे आणि  जून महिन्यात विदर्भावरही जलसंकट ओढवण्याची शक्यता आहे.
अमरावती विभागात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा झपाटय़ाने कमी होत असून विभागातील मोठय़ा, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ७६६ दशलक्ष घनमीटर म्हणजे २५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठय़ा प्रकल्पांमध्येही ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. या प्रकल्पांमधून अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो. शिल्लक साठा कमी असल्याने काही भागात पाणी कपातीची वेळ आली आहे. अमरावती विभागातील ९ मोठय़ा प्रकल्पांची क्षमता १ हजार ५४० दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ४०६ दलघमी (२६ टक्के) जलसाठा उरला आहे. ६५९ दलघमी क्षमतेच्या २३ मध्यम प्रकल्पांमध्ये २०७ दलघमी (३१ टक्के), तर ४५८ दलघमी क्षमतेच्या ३३८ लघु प्रकल्पांमध्ये ८५८ दलघमी (१८ टक्के) पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पांमधून बाष्पीभवनामुळे पाणी कमी होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. सिंचनासाठी काही प्रकल्पांमधून पाणी वापरले जात असताना घट अपरिहार्य असली, तरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण ठेवले गेल्याने काही प्रकल्पांना धोका नाही. मात्र, काही धरणांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक उरला आहे.
अमरावती विभागातील सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा प्रकल्पातून अमरावती आणि इतर काही शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या १८३ दलघमी (३२ टक्के) पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्य़ातील काटेपूर्णा प्रकल्पात मात्र केवळ १६ दलघमी (१९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्’ाातील पूस प्रकल्पात ३५ दलघमी (३८ टक्के), अरुणावती प्रकल्पात ५० दलघमी (२९ टक्के), बेंबळा प्रकल्पात ७७ दलघमी (२५ टक्के), बुलढाणा जिल्’ाातील वाण प्रकल्पात ४० दलघमी (४९ टक्के), नळगंगा प्रकल्पात तर ५ दलघमी म्हणजे केवळ ७ टक्केच पाणीसाठा उरला आहे.
पेनटाकळी आणि खडकपूर्णा प्रकल्पात तर पाण्याची साठवणूकच झाली नाही. गेल्या वर्षी याच कालावधीत अमरावती विभागातील सर्व सिंचन प्रकल्पांमध्ये २१ टक्के पाणीसाठा होता. यावर्षीही अशीच स्थिती आहे. २०११ मध्ये मात्र या काळात ३४ टक्के पाणीसाठा होता. विभागात गेल्या वर्षी उशिरा पावसाळा सुरू झाला. पण, नंतर पावसाने कसर भरून काढली. काही प्रकल्प तर तुडूंब भरले. पण, मोठय़ा प्रमाणावर पाणी वापरले गेल्याने जलसाठा झपाटय़ाने कमी झाला. त्यातच कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला
आहे.