हिंदूी चित्रपटसृष्टीतील ‘फिल्म फॅमिली’प्रमाणे मराठीतही ‘फिल्म फॅमिली’ आहेत. सचिन, महेश कोठारे, रिमा, अनिल मोहिले आदींची मुले-मुली मराठी चित्रपटात आणि एकूणच चित्रपटसृष्टीत आली आहेत. महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ ‘स्टॅण्डबाय’ या संजय सूरकर दिग्दर्शित चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आला. आता सचिन पिळगावकर आपली कन्या श्रीया हिला चित्रपटात आणत आहेत.
सचिन-सुप्रिया ही जोडी मराठी जनमानसामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. नंतरच्या काळात ‘नच बलिये’सारख्या कार्यक्रमांतूनही मराठीबरोबरच हिंदीमध्येही त्यांनी आपला ठसा उमटविला. आता त्यांची मुलगी श्रीया रुपेरी पडद्यावर येतेय.
सुश्रीया चित्र या आपल्या कंपनीद्वारे यूएफओ मूव्हीज इंडियाच्या सहकार्याने सचिन ‘एकुलती एक’ या चित्रपटाची निर्मिती करणार असून त्यातून श्रीया रुपेरी पडद्यावर पदार्पण करतेय. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
पिता-कन्येचे हळवे नाते माहीत असते. याच नात्यावर आधारित असा चित्रपट वास्तवातील वडील-मुलगी म्हणजेच सचिन-श्रीया पडद्यावर दाखविणार आहेत.
यानिमित्ताने यूएफओतर्फे आगळीवेगळी स्पर्धा प्रेक्षकांसाठी जाहीर केली आहे. पिता-कन्या जोडय़ांना या स्पर्धेसाठी आमंत्रित केले जाणार आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या प्रोमोमध्ये संधी दिली जाणार आहे. समस्त मराठी कन्यांनी आपल्या आयुष्यात घडलेली खास गोष्ट किंवा अनुभव पाठवायचा आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरातून पिता-कन्यांची प्रत्येकी एक जोडी निवडली जाणार आहे. यूएफओ मूव्हीज, पोस्ट बॉक्स क्र. ९४२३, अंधेरी पूर्व, एमआयडीसी, मुंबई-४०००९३ या पत्त्यावर महाराष्ट्र, भारत लिहून माहिती पाठवायची आहे. त्याशिवायी‘४’३्री‘@४ऋे५्री२.ूे अथवा फेसबुकवरीली‘४’३्री‘ या पेजवरही माहिती पाठवता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2013 रोजी प्रकाशित
श्रीया पिळगावकर अवतरणार मोठय़ा पडद्यावर
हिंदूी चित्रपटसृष्टीतील ‘फिल्म फॅमिली’प्रमाणे मराठीतही ‘फिल्म फॅमिली’ आहेत. सचिन, महेश कोठारे, रिमा, अनिल मोहिले आदींची मुले-मुली मराठी चित्रपटात आणि एकूणच चित्रपटसृष्टीत आली आहेत. महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ ‘स्टॅण्डबाय’ या संजय सूरकर दिग्दर्शित चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आला. आता सचिन पिळगावकर आपली कन्या श्रीया हिला चित्रपटात आणत आहेत.

First published on: 31-03-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shriya pilgaonkar comeing on silverscreen