एसएनडीएलकडून गोरेवाडामधील १, २, ३ जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि मध्य नागपुरातील अनेक वस्त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सने केला आहे. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सकडे शहरातील पाणी पुरवठाची जबाबदारी असताना त्यांच्यावर नेहमी खापर फोडले जात असताना आता त्यांनी एसएनडीला या संदर्भात दोषी धरले आहे.
मंगळवारी आणि बुधवारी सायंकाळी जवळपास दीड तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता, त्यामुळे गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रातून कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू झाला. एसएनडीएलच्या अपर सब स्टेशनच्या वाय फेजवरील एक जंपर सायंकाळी निकामी झाले होते. त्यावेळी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी वीज पुरवठा पूवर्वत झाला. तो पुन्हा १० ५० खंडित झाला होता. यापूर्वी ६ व ७ जूनला गोरेवाजा जलशुद्धीकरण केंद्राला वीज खंडित करण्याचा फटका बसला आहे. सायंकाळी वीज खंडित होत असल्यामुळे रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कमी दाबाने पुरवठा होत असतो त्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे कठीण होते. नागरिकांना पाणी न मिळण्यासाठी एलएनडीएल दोषी धरले आहे. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सच्या कार्यालयावर मोर्चे काढले जात असतील तर त्यामागचे कारण नागरिकांनी समजून घ्यावे, असे आवाहन ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सने केले आहे.