दुधाचा टँकर पलटी झाल्याने सहा विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात सावर्डे (ता.पन्हाळा) येथे झाला. जखमी विद्यार्थ्यांवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावर्डे येथील सुमारे २० मुले एका दुधाच्या टँकरमधून शाळेला जात होती. रस्त्यामध्ये टँकर पलटला. सुदैवाने फार मोठी हानी झाली नाही. सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले. सहा जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2012 रोजी प्रकाशित
दुधाचा टँकर उलटून सहा विद्यार्थी जखमी
दुधाचा टँकर पलटी झाल्याने सहा विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात सावर्डे (ता.पन्हाळा) येथे झाला. जखमी विद्यार्थ्यांवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावर्डे येथील सुमारे २० मुले एका दुधाच्या टँकरमधून शाळेला जात होती. रस्त्यामध्ये टँकर पलटला.
First published on: 15-12-2012 at 09:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six students injured in milk tanker accident