दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष व महिलांनी चांगला सहभाग नोंदविला. सोलापूरच्या अनिल पवारने पुरुष गटात, तर महिला गटात अहमदनगरच्या निकिता नागपुरेने पहिले पारितोषिक पटकावले. पुरुष गटात वासीमच्या भास्कर कांबळेने दुसरा व तावरजखेडा येथील सूर्यकांत फेरेने तिसरा क्रमांक, तर परभणीच्या ज्योती गवतेने महिला गटात दुसरा व नांदेडच्या मीनाक्षी गायकवाड हिने तिसरा क्रमांक मिळविला.
संस्थेच्या प्रवेशद्वारापासून स्पर्धेस प्रारंभ झाला. आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई मुरलीधर इन्नानी, सचिव रमेश बियाणी उपस्थित होते. पुरुष व महिला अशा दोन गटांतील स्पर्धेत राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले.
पुरुषांसाठी ११, तर महिलांसाठी ५ किलोमीटर अंतराची स्पर्धा झाली. शहरात ठिकठिकाणी स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी मुला-मुलींचे पथक उभे होते.
शहर पोलीस उपअधीक्षक तिरुपते काकडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2013 रोजी प्रकाशित
सोलापूरचा पवार, नगरची निकिता नागपुरे विजेते
दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष व महिलांनी चांगला सहभाग नोंदविला. सोलापूरच्या अनिल पवारने पुरुष गटात, तर महिला गटात अहमदनगरच्या निकिता नागपुरेने पहिले पारितोषिक पटकावले.
First published on: 29-01-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapurs pawar and nager nikita wins